इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेची विविध किल्ल्यांवर पदभ्रमंती

इचलकरंजी / प्रतिनिधी 
सालाबादप्रमाणे इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेच्या वतीने यावर्षीसुध्दा विविध गड-किल्ल्यांवर पदभ्रमंती मोहिम राबविली. या मोहिमेत कल्याणगड, साखरगड, वर्धनगड, महिमानगड, पांडवगड, वैराटगड या किल्ल्यांना भेटी देतानाच तेथे स्वच्छता मोहिम घेण्यात आली.
‘साहस हा पाया, निसर्ग रक्षण हेच ध्येय’ हाच उद्देश ठेवून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी धडपडणारी संघटना म्हणून  इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना कार्यरत आहे. या संघटनेला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर फडकविला जाणार्‍या  भगव्या ध्वजाचा मान मिळालेला आहे. गत अनेक वर्षांपासून अखंडीतपणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात या संघटनेच्या वतीने ‘पन्हाळा-पावनखिंड’ मोहिम आयोजित केली जाते. तर दरवर्षी दिवाळी सुट्टीत संघटनेच्या वतीने पदाधिकारी व हौशी गिर्यारोहकांची गड-किल्ल्यांवर पदभ्रमंती मोहिम केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांना भेट देऊन तेथील माहिती सर्वांना देण्यासह त्याठिकाणी स्वच्छता मोहिम हाती घेतली जाते. त्यानुसार यंदाच्या सुट्टीत कल्याणगड, साखरगड, वर्धनगड, महिमानगड, पांडवगड, वैराटगड या किल्ल्यांवर पदभ्रमंती करण्यात आल्या. या मोहिमेत सुनिल कोठावळे, राजेंद्र ढपाले, गजानन पारनाईक, विजय कोपार्डे, तुकाराम जांभळे यांच्यासह पदाधिकारी व हौशी गिर्यारोहक सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी सचिन कांबळे, धर्मदास मोटे, रंजन रेडेकर व संघटनेचे सहकार्य लाभले.
Spread the love
error: Content is protected !!