पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

कर्नाटक राज्यातील संकेश्वर याठिकाणी कोकण गिडडा व खिलारी जातीचे ११ बैले कत्तलीसाठी घेवून जाणारा आयशर ट्रक शिरोली पोलिसानी सांगली फाटा येथे पकडून त्यांची गो शाळेत पाठवण्यात आली.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि आरोपी ऋषिकेश शांताराम वारे वय २४ रा.पेठनाका ता वाळवा,जि.सांगली हा कोकण गिडडा व खिलारी जातीचे ११ बैल, एम एच ४५ ए एफ ५५६७ या आयशर ट्रकमधून कर्नाटक येथील संकेश्वर याठिकाणी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मानद प्राणी कल्याण अधिकारी आशीष कमलाकांत बारीक याना मिळाल्याने त्यानी आयशर ट्रकचा पाठलाग करून शिरोली पोलिसांच्या मदतीने सांगली फाटा येथे आयशर ट्रक आडवून ट्रकची पहाणी केली असता.आयशर ट्रकमध्ये दमदाटीने ११ बैले अ पुरेशा जागा व चारापाणीची सोय न करता घेऊन जाणाऱ्या वारे यांच्याकडे अदिक चौकशी केली असता त्याने हि बैले संकेश्वर येथे कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलिसानी सर्व बैले ताब्यात घेवून त्याना कराड येथील गो शाळेत पाठवण्यात आली. या गुन्ह्य़ाची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

Spread the love
error: Content is protected !!