शिरोली पुलाची येथे घनकचरा व मैला गाळ प्रकल्पाच्या भूमिपूजनास विरोध तहसीलदारांच्या मध्यस्थीने वादावर पडदा उद्या मंगळवारी जागा निश्चित करून भुमिपुजन होणार ? 

Spread the love

शिरोली पुलाची येथे घनकचरा व मैला गाळ प्रकल्पाच्या भूमिपूजनास विरोध तहसीलदारांच्या मध्यस्थीने वादावर पडदा उद्या मंगळवारी जागा निश्चित करून भुमिपुजन होणार ?

   पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची येथे पंतप्रधान योजनेअंतर्गत मंजूर झालेला घनकचरा (२७ लाख रुपये) आणि मैला गाळ व्यवस्थापन (२ कोटी ३८ लाख रुपये) प्रकल्प ग्रामपंचायतीच्यावतीने ५४ एकर शासकीय गायरानातील ५ गुंठे जागेवर राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सत्ताधारी व पदाधिकाऱ्यांना अतिक्रमणधारकांच्या तीव्र विरोधामुळे माघार घ्यावी लागली. दिवसभर चाललेल्या या शाब्दिक वादावादीनंतर हातकणंगलेच्या तहसीलदारांनी मध्यस्थी करत मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंतचा जागा निश्चित करून प्रकल्पास सुरूवात करण्याचे आदेश त्यासाठी अतिक्रमण धारकांनी सहकार्याची भुमिका घेणे गरजेचे .

शिरोली पुलाची( ता हातकणंगले ) गावाच्या हिताचा हा महत्त्वाचा प्रकल्प ५४ एकर गायरान माळावरील ५ गुंठे जागेवर राबवण्याचा ग्रामपंचायतीने ठराव केला होता. त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषद सदस्य, सलीम महात , पंचायत समिती सदस्य सौ कमल कौंदाडे व सरपंच पद्मजा करपे , उपसरपंच विजय जाधव , ग्रामविकास अधिकारी सौ गिता कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सत्ताधारी सदस्य भूमिपूजनासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारकांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वादावादी झाली व दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर याना बोलावण्यात आले बेल्हेकर यानी तातडीने घटनास्थळी धाव घेवून ५४ एकर जागेचा नविन नकाशाची पाहणी करून सत्ताधारी व अतिक्रमण धारकांची मते जाणून घेतली व प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अतिक्रमणधारकांना खडे बोल सुनावले. तसेच, उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजेपर्यंत स्वतःहून जागा निश्चित करून द्या, अन्यथा ठरलेल्या जागेवरच पोलीस बंदोबस्तात भूमिपूजन करून प्रकल्प राबवला जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी मार्ग काढला.

पण गेल्या ४० वर्षांपासून या ५४ एकर शासकीय गायरान जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी शेती व वीटभट्टी व्यवसाय सुरू केल्यामुळे मूळ गायरान संपुष्टात आले आहे. या अतिक्रमणाबाबत काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी आवाज उठवला होता. सध्या या प्रकरणी न्यायालयातून स्थगिती (स्टे) आणण्यात आली असल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर अनेकांची शेती व वीटभट्टी व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो. न्यायालयाच्या चौकटीत राहूनच निर्णय व्हावा. तसेच, हा प्रकल्प नदीपात्राच्या कडेला केल्यास शेतीचे मोठे नुकसान होईल. आमचा गावच्या हिताच्या या प्रकल्पाला विरोधात नाही, मात्र सध्या निवडलेल्या जागेला आमचा विरोध आहे असे अतिक्रमणधारकांनी स्पष्ट केले. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत प्रकल्पासाठी योग्य असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांना दिले आहे. त्यानंतर त्या जागेचे भूमिपूजन करून प्रकल्पास सुरुवात करावी, अशी विनंती ही त्यांनी केली आहे. आता मंगळवारी यावर नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.

यावेळी माझी उपसरपंच कृष्णात करपे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील ,डॉक्टर सुभाष पाटील ,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, महादेव सुतार ,महंमद महात, महादेव सुतार, संदीप तानवडे, योगेश खवरे, अरिफ सर्जेखान,दीपक यादव, हर्षदा यादव, संदेश शिंदे श्रीकांत कांबळे, तलाठी महेश सूर्यवंशी कोतवाल संदीप पुजारी,विठ्ठल पाटील ,भगवान पाटील ,सर्जेराव खवरे, सर्जेराव कदम ,पाटील सलीम मुल्ला आधी सह उपस्थित होते

Leave a Comment

error: Content is protected !!