राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराचा शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार अशोक इंगळे- पाटील यांना जाहीर 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार वाचनालयाचे नियमित वाचक आणि प्रतिष्ठित नागरिक अशोकराव धोंडीराम इंगळे- पाटील यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.२ जून २०२६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.प्रत्येक वर्षी राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्यावतीने शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी अशोकराव इंगळे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबुळू यांचे हरवलेले सुसंस्कार आणि वाढलेले विकार याविषयी व्याख्यान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम दबडे, संजय शिंदे, उद्योजक चिंतामणी गोंदकर, पत्रकार डी. आर. पाटील, आप्पालाल चिकोडे, चंद्रकांत भाट, महेश पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. मंगळवार दि.२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता वाचनालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब माने गावडे, उपाध्यक्ष एम. एस. माने, कार्यवाह धनाजीराव जाधव यांनी दिली आहे. यावेळी वाचनालयाचे सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!