वाजता पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पोलिसातून मिळाली.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली पुलाची येथील शेतकरी राजाराम बजरंग डागे वय ४६ हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच ०९ ई वाय ९३०५ ने खारवत या नावाच्या शेताकडे जात असताना ते सांगली फाटा येथे आल्यावर रस्त्यावरील वाहनांचा अंदाज घेवून रस्ता ओलांडण्यासाठी थांबले असता पाठीमागील येणाऱ्या ट्रक क्रमांक सी जी ०४ एल एल ५०४० या ट्रक चालकाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, अविचाराने,भरधाव वेगाने ट्रक चालवून राजाराम यांच्या मोटरसायकला पाठीमागील धडक देवून १५ फूट फरफटत नेल्याने राजाराम हे जखमी झाले त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे याबाबतची फिर्याद राजाराम यांच्या भावाने शिरोली पोलिस दिली आहे.सांगली फाटा येथील सीसीटीव्ही फुटेज पाहता ट्रक चालकाचे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले खरे पण लोकांच्या आरडाओरड मुळे ट्रक चालकाने ट्रक १५ फूटावर नेहून थांबवला त्यामुळे राजाराम यांचा जीव वाचला या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर वायर झाला आहे या फुटेज मुळे या अपघाताचे गांभीर्य लोकांपुढे येत आहे .