शिरोळ तालुक्यातील अवैध धंदे रोखण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल बसू यांचे समोर आव्हान 

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट रूप धारण केले असून दारू, मटका, जुगार, लॉजिंग तसेच अमली पदार्थ विक्रीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालले आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही पोलिस प्रशासन मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.उदगाव – अंकली … Read more

लोकांच्यासाठी काम करा,लढा, प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न करा :आ. रोहितदादा पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न शिरोळ / प्रतिनिधी  देशाचे लोकनेते शरदचंद्र पवारसाहेब व अजितदादा एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती.त्यांनी ती बोलून ही दाखविली होती. पक्षांतर्गत भांडण वेगळे आहे.थोडा धीर धरा.लोकांच्यासाठी काम करा.लढा, प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न करा.असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला.ते तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या निवासस्थानी आयोजित शिरोळ तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार … Read more

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जयसिंगपूर / प्रतिनिधी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, सामाजिक आणि सेवाभावी … Read more

शहीद रोहित खन्नीकुडे कुटुंबियांसाठी सर्वतोपरी मदत आ.रोहितदादा पवार यांचे आश्वासन

हेरवाड / प्रतिनिधी देशाच्या संरक्षणासाठी आपला पुत्र गमावण्याचे दु:ख मोठे असले तरी त्याच्या त्यागाचा अभिमान संपूर्ण देशाला आहे.शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांनी टाकळीवाडी येथील शहीद जवान रोहित खन्नीकुडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन भेटी दरम्यान व्यक्त केले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या रोहितच्या बलिदानाने संपूर्ण टाकळीवाडी … Read more

धगधगते आंदोलन… निस्वार्थी नेतृत्व: शिरोळच्या स्वाभिमानासाठी अंकुशचा हुंकार

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ तालुक्याच्या मातीला एक वेगळीच ओळख आहे. इथली जमीन जशी सुपीक आहे, तसंच इथल्या लोकांच्या मनातही स्वाभिमान, संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा खोलवर रुजलेली आहे.पण गेल्या काही वर्षांत या भूमीवर राजकारणाची दिशा बदलताना दिसते आहे. निवडणुका आल्या की जनतेसमोर विकासाची स्वप्नं मांडली जातात, आश्वासनांचे डोंगर उभे केले जातात, आणि निवडणुका संपल्या की … Read more

आमदार रोहित पवारांचा कोल्हापूर-शिरोळ दौरा; महाविकास आघाडीत नवसंजीवनी

शिरोळ / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा मंगळवारी दि. ५ मे रोजी कोल्हापूर आणि शिरोळ तालुक्यात नियोजित दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीत नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून,आठवड्याभरात दुसऱ्यांदा शिरोळला दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.दौऱ्याची सुरुवात पहाटे कोल्हापूर येथील श्री जोतिबा … Read more

गोवा कराड पर्यंत पसरलं जाळ; फुलाची शिरोली प्रकरणात धक्कादायक पुरावे हाती

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे पुलाची शिरोली प्रकरणात आक्षेपार्ह साहित्य जप्त कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून तपासाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर जाऊन गोवा आणि कराडपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामी केल्याच्या आरोपांमुळे शाहिद समीर सनदे आणि शाहरुख हुसेन देसाई … Read more

छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर यादव वाडी येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात काढण्यात आली. सकाळपासूनच परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. नागरिक, युवक, महिला व लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग यावेळी पाहायला मिळाला.शोभायात्रेची सुरुवात माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण यांच्या हस्ते … Read more

पेठवडगाव पाच लाख रुपये खंडणीसाठी वैभव उपाध्ये यांचे अपहरण आणि मारहाण

 पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या केबल व्यावसायिक असलेल्या 35 वर्षीय वैभव शितल उपाध्ये यांचे अपहरण करून पाच लाख रुपये खंडणी दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पाठीमध्ये कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या 20 वर्षीय ओमकार दबडे आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांच्यावर पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

सिद्धिविनायक मंदिर परिसरात दुर्गा सहेलीचा स्तुत्य उपक्रम; महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी  मौजे आगर येथील जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली या सामाजिक संस्थेमार्फत सिद्धिविनायक मंदिर परिसरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये मॅमोग्राफीद्वारे स्तनाच्या कॅन्सरची तपासणी तसेच जनरल हेल्थ चेकअप, बीपी आणि शुगर तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिराचे उद्घाटन उद्योजिका सौ. रेखा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more