जनतेच्या सेवेसाठी प्रशांत शहापूरे यांचे नरसोबावाडीत जनसंपर्क कार्यालय सुरू

नरसोबावाडी / प्रतिनिधी आलास जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे युवा व लोकाभिमुख जिल्हा परिषद सदस्य प्रशांत दादा शहापूरे यांनी मतदार संघातील जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी नरसोबावाडी येथे जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली.या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती तथा गणेशवाडीचे … Read more

दत्तवाड येथील ‘दत्त वस्त्रम’ कापड दुकानाला भीषण आग, शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज; लाखो रुपयांचे नुकसान

दत्तवाड / प्रतिनिधी  दत्तवाड येथील हायस्कूल रोड परिसरातील सुपरिचित व ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या ‘दत्त वस्त्रम’ या कापड दुकानाला आज रविवार दिनांक २४ मे रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांच्या कापडाचे नुकसान झाले.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार,दुकानाच्या तळघरात असलेल्या लहान मुलांच्या कपड्यांच्या विभागात प्रथम आग लागल्याचे निदर्शनास … Read more

शिरोळ येथे बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी येथील बहुजन असंघटित कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष व रिपब्लिकन कामगार सेनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ.शंकरदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात रक्त , नेत्र तपासणी बरोबरच कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.येथील बहुजन असंघटित कामगार संघटना कार्यालयात शिबिर झाले.आरोग्य विषयक उपक्रमात … Read more

स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने मजरेवाडी येथील १० लाखांची लूट प्रकरणी एकाला अटक

कुरुंदवाड / प्रतिनिधी  शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी परिसरात स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत सांगली जिल्ह्यातील दोन नागरिकांकडून १० लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणाचा कुरुंदवाड पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या काही तासांत मुस्ताक साहेब हुसेन पटेल (वय ५८) याला अटक केली असून,मुख्य आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कर्नाटकात … Read more

पुलाची शिरोली (रेणूका नगर) येथील दिपक पाटील यांचे निधन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी पुलाची शिरोली (रेणूका नगर) येथील दिपक नानासो पाटील वय वर्षे ३२, यांचे आकस्मिक निधन झाले.पश्चात आई व बहिण असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता आहे.

पुलाची शिरोली येथील श्रीमती शालन पाटील यांचे निधन

पुलाची शिरोली प्रतिनिधी पुलाची शिरोली येथील श्रीमती शालन शिवाजी पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या कै. शिवाजी रंगराव पाटील यांच्या पत्नी होत. तसेच अंक विक्रेता व एजंट संतोष पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार … Read more

शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध

पुलाची शिरोली / प्रतिनिधी  शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अमर सिध्दराया स्वामी (वय ५५, रा. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक ३२/२०२३ भा.न्या.स.का. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. … Read more

शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन – उद्यान पंडित गणपतराव पाटील; नांदणीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नांदणी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्यान पंडित गणपतराव पाटील होते.कार्यक्रमात गावातील मान्यवर,पालक, शिक्षकवृंद,सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली.दहावी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन … Read more

१२ कोटींच्या विकासकामांना शिरोळ शहरात मिळणार गती – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव 

बिरदेव नगरात भुयारी गटर व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिव-शाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनेल कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांमधून शहरात सुमारे १२ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत,अशी माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली. शहरात पारदर्शक,लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी नागरिकांनी यादव पॅनेलवर विश्वास दाखवला असून तो … Read more

श्री दत्त उद्योग समूह्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा – मंत्री हसन मुश्रीफ

शिरोळ / प्रतिनिधी  राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूह यांना सदिच्छा भेट देत शेती, सहकार, सामाजिक विकास आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली.यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बैठकीत विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “क्षारपड … Read more