दत्त उद्योग समूहास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार विनय कोरे यांची सदिच्छा भेट

कृषी, उद्योग व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा; ग्रामीण प्रगतीला गती देण्याचा निर्धार शिरोळ / प्रतिनिधी  दत्त उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देत समूहाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत … Read more

आमदार डॉ.अशोकराव माने यांचा वाढदिवसानिमित्त जनसंपर्क व सामाजिक उपक्रमांनी भरलेला दौरा

शिरोळ / प्रतिनिधी  हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांचा सोमवार, दि.१ जून रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, लोकाभिमुख आणि जनसंपर्क कार्यक्रमांनी भरलेला दौरा आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर मतदारसंघातील विविध ठिकाणी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत शिरोळ येथे नागरिकांच्या वाढदिवसाच्या … Read more

विकासरत्न आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) : संघर्षातून घडलेले लोकनेतृत्व आणि विकासाचे नवे पर्व ; जनतेच्या विश्वासाचा मानबिंदू

शिरोळ / प्रतिनिधी  अनुकूल परिस्थितीत यश मिळविणारे अनेक असतात;परंतु प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत शून्यातून स्वतःचे विश्व उभे करणारे आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व मात्र विरळाच असते. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, दलितमित्र, समाजसेवक आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले डॉ. अशोकराव माने (बापू) हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, … Read more

शिरोळभूषण पुरस्कारासाठी खंडेराव जगदाळे व जयसिंगराव पाटील यांची निवड; गणपतराव पाटील (दादा) यांच्याकडून अभिनंदन

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषद व आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “शिरोळभूषण पुरस्कार २०२६” साठी खंडेराव जगदाळे आणि जयसिंगराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील (दादा) यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या.सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी तसेच … Read more

डॉ.सुनेत्रा शिराळे ठरल्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या होमिओपॅथी पी.एच.डी.तज्ज्ञ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मेडिसिन विषयात पीएच.डी.; संशोधन, अध्यापन व रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  नागाव (ता. हातकणंगले) येथील प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.सुनेत्रा शिराळे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मेडिसिन विषयामध्ये पीएच.डी.पदवी संपादन करून वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या होमिओपॅथी विद्याशाखेमधून पीएच.डी.प्राप्त करणाऱ्या त्या पश्चिम … Read more

महसूल विभागाच्या नाकावर टिचून माती माफियांचा हैदोसरात्रीतून कोट्यवधींची माती उपसा; अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलावर पाणी

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू असलेला अवैध माती उत्खननाचा धंदा आता रात्रीच्या अंधारातही बिनधास्तपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.महसूल विभागाच्या नाकावर टिचून माती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांतून केला जात आहे. शिरोळ तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात जेसीबी, पोकलेन आणि … Read more

जलमापक मीटर व पाणीपट्टी वाढीस शेतकऱ्यांचा विरोध; जलसंपत्ती प्राधिकरणाकडे हरकती सादर

शिरोळ / प्रतिनिधी  महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क वाढविणे तसेच जलमापक यंत्र बसवून शेतकऱ्यांना मोजून पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगली पाटबंधारे विभागास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या प्रस्तावास विरोध दर्शवत प्राधिकरणाकडे लेखी हरकत सादर … Read more

शिरोळच्या जिव्हाळ्याच्या पाणीपुरवठा व भुयारी गटार प्रश्नांवर २ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ शहराच्या विकासाशी निगडित आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या ठरलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांवर येत्या मंगळवार, २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक व सुनावणी पार पडणार आहे. शहरातील चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली मिळकत कर आकारणी,रखडलेली नवीन पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटर योजना या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय … Read more

चुकीच्या कर आकारणीमुळे शिरोळ पालिकेची आर्थिक कोंडी – पृथ्वीराजसिंह यादव 

नागरी सुविधांसाठी शासनाकडे २० कोटींचा प्रस्ताव; कन्यागत २०२८ अनुषंगाने २०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी शिरोळ / प्रतिनिधी  चुकीच्या कर आकारणीमुळे नागरिकांकडून करभरणा अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने शिरोळ नगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत आली असून शहरातील नागरी सेवा व मूलभूत सुविधा पुरविणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर शहर विकासासाठी शासनाकडे सुमारे २० कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी … Read more

दुर्ग संवर्धनासाठी आसमा कुरणेची ऐतिहासिक दौड शिवकालीन १२ किल्ल्यांच्या भेट मोहिमेचा पन्हाळगडावर समारोप

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचावा आणि युवकांमध्ये दुर्ग संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने कोल्हापूरची धावपटू आसमा कुरणे हिने सुरू केलेल्या ऐतिहासिक धाव मोहिमेचा गुरुवार, दि. २८ मे रोजी पन्हाळगडावर समारोप होत आहे. तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास धावत पूर्ण करून शिवकालीन १२ किल्ल्यांना भेट देण्याचा … Read more