भाजपा महिला मोर्चाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.वर्षा पाटील यांची निवड
अब्दुललाट / प्रतिनिधी
येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.वर्षा अंकुश पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या ग्रामीण पूर्व विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.अ.लाट येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीमध्ये एक वर्षापूर्वी निवडून आल्या आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व संघ कार्याशी त्यांचे घराणे अनेक वर्षांपासून जोडले गेलेले आहे. सामाजिक,राजकिय,शैक्षणिक आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहेत.
सामाजिक,शैक्षणिक,महिला उन्नती,महिला संघटन, राजकीय क्षेत्रातील कार्य तसेच भाजप पक्षातील कार्य पाहून महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मा.सौ.शौमिका महाडिक व प्रदेश भाजप महिला मोर्चा यांच्या मार्गदर्शनानूसार विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.वर्षा अंकुश पाटील यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (पूर्व) विभागाच्या महिला मोर्चाच्या ‘जिल्हा उपाध्यक्षा’ पदी निवड करण्यात आले.निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांचे हस्ते देण्यात आले.यावेळी कोल्हापूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.पुष्पाताई पाटील,जिल्हा महिला मोर्चा सरचटणीस सौ.रमाताई फाटक,
सौ.रागिणी शर्मा जिल्हा सरचिटणीस तसेच महिला मोर्चाचे इचलकरंजी,हातकणंगले शिरोळ,पन्हाळा मंडल अध्यक्ष आणि कार्यकारणी,महिला पदाधिकारी उपस्थित होते.