उचगांवात 10 किलो गांजा जप्त.. शिरोलीच्या दोघांना अटक….
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
गांजा विक्री करणेसाठी आलेल्या दोन व्यक्तींना अटक करून 10 किलो ग्रॅम वजनाच्या गांजा सह एकूण 6,लाख 60हजार – रुपयेचा मुददेमाल जप्त केला . ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने केली आहे..
कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, नीलोत्पलसो यांनी नशा मुक्त कोल्हापूर जिल्हा करणेकामी जिल्हयातील अवैद्य अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते .
त्या आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अमंली पदार्थांची विक्री व साठा करणारे इसमांचे समूळ उच्चाटण करणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थाची विक्री व साठा करणारे इसमांची माहिती काढुन सदर व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या होत्या .
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक अंमली पदार्थ विक्री करणारे इसमाचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, गांधीनगर पोलीस ठाणे हददीमधील माळीवाडा उचगाव इथ दोन इसम त्यांचेकडील अॅक्सेस मोटर सायकलवरुन गांजा या अमली पदार्थाची विक्री करणेकामी येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाई कामी सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील अमंलदार यांनी माळीवाडा उचगांव याठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई केली, छापा कारवाई मध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे विचारली असता राम मारुती सावंत वय २१, राहणार . यादववाडी शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर आणि राज गणेश पारखे वय .२२, राहणार . गणपती मंदीर शेजारी, शिरोली पुलाची, ता. हातकगणंले, जि. कोल्हापूर असे सांगीतले त्याचे कब्जातुन पथकाने कायदेशीर प्रकीया करून १० किलो ग्रॅम वजनाचा गांजा अमंली पदार्थ जप्त केला त्याच प्रमाणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची अंगझडती घेवुन त्यांचेकडुन एक दुचाकी मोपेड व तीन मोबाईल हँडसेट असा एकुण ६ लाख ,६०हजार /- रुपयेचा मुददेमाल दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला, ताब्यात घेतलेल्या इसमांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी, कोल्हापूर शहरामध्ये व आजु बाजुचे परिसरामध्ये चोरुन गांजा विक्री करीत असलेचे सांगीतले, ताब्यात घेतलेल्या दोघा विरोधात गांधीनगर पोलीस ठाणेत एन डी पी एस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गांधीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बरगे, संदीप सावंत, विशाल खराडे, शिवानंद मठपती, रवि लंबे, गजानन गुरव, सत्यजित सावंत, सागर चौगले, अशोक पवार, अरविंद पाटील, महादेव कु-हाडे, अरुण धनगर यांनी केली