‘या’ धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

Spread the love
साताऱ्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी (ता.वाई) जवळ कालव्याच्या तळाला रविवारी पहाटेचा सुमारास भगदाड पडून फुटला.अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेतीचे नुकसान टळले आहे.गेल्या दीड महिन्यापासून कालव्यातून १९० ते २०० क्युसेक्सने पाणी सुरु होते.दरम्यान कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेती नुकसानीचा मोठा अनर्थ टळला आहे.मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
error: Content is protected !!