स्नेहलने आदर्श कन्या व सून म्हणून पाटील घराण्याचा गौरव केला : विजयानंद माने

Spread the love

स्नेहलने आदर्श कन्या आदर्श सून म्हणून पाटील घराण्याचा गौरव केला : विजयानंद माने
यड्राव / प्रतिनिधी

 

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाबरोबर स्नेहलेची सचोटी आणि अमोलची खंबीर साथ यामुळेच आजचा सत्कार हा स्नेहमोल श्रम साफल्याचा स्नेहल चा गौरव आहे. एक आदर्श कन्या, सून म्हणून स्नेहलने पाटील घराण्याच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरव उदगार बीएसएनएल जिल्हा अध्यक्ष विजयानंद माने यांनी काढले.
कोल्हापूर येथे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन टेलिफोन भवन ताराबाई पार्क कार्यालयामध्ये नूतन तलाठी पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहल अमोल पाटील यांचा सत्कार फेटा, पुष्पगुछ देऊन करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना स्नेहल अमोल पाटील म्हणाल्या आज पहिलाच सत्कार युनियन केला हा माझा घरचा सत्कार म्हणून सदैवच आठवणीत राहील.
यावेळी बीएसएनएल कर्मचारी पतसंस्थेचे खजिनदार अमोल पाटील, नितीन देशपांडे, संजय बागडी, अशोक कांबळे, संदीप दिवसें, जयकुमार करवडे, नंदा पाटील, संजय चव्हाण, रमेश मावळे, सतीश पाटील, सचिन पाटील, सुभाष पाटील, सुरेश लिगाडे, यांच्यासह युनियन पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा सचिव नितीन देशपांडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!