दुधाच्या वजनात,फॅट व एस एन एफ मध्ये फसवणूक

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी
वैध मापन विभागाच्या राज्याच्या नियंत्रकांनी दुध संकलन करणाऱ्या दुध डेअरी ना 10 मिली अक्युरशी असलेले वजन काटे वापरण्याचे आदेश दिले होते.तसेच जिल्ह्याचे दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी फॅट व एस एन एफ काढण्यासाठी ऑटो मिल्क टेस्टर वापरणे व त्यानुसार उत्पादकास दर देण्याचे परीपत्रक काढून सूचना केल्या होत्या.शिरोळ तालुक्यात अनेक दुध डेअरी कडून याचे पालन होत नसल्याची बाब आंदोलन अंकुशने जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली होती.याची दखल घेऊन  दुग्ध विकास विभागातील अधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील दानोळी आणि उदगाव येथे अचानक धाडी टाकून कारवाई केली असल्याने शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादक संस्थामध्ये खळबळ उडाली आहे.या दुध डेअरीमध्ये वजनकाटा 100 मिली अक्युरशी वापरला जात होता.वजन दर्शवणाऱ्या डिस्प्ले वर चिकट पट्टी लावल्याचे दिसले.वजन काट्यावर आलेले वजन उत्पादकांच्या वहीत नोंदवले जात नाही.एस एन एफ काढला जात नाही वहीत नोंदवला जात नाही. फॅट काढण्यासाठी जादा दुध घेतले जात होते. ऑटो मिल्क टेस्टर असताना वापरले जात नाही.वरील गंभीर बाबी उघड झाल्याने दुध उत्पादकांची दररोज फसवणूक होत असल्याचे विभागाच्या या धाडीतून समोर आल्याने अधिकाऱ्यांनी आपला अहवाल दुग्ध विकास विस्तार अधिकारी श्री दवडते यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्री. आवटे यांच्याकडे सादर केला आहे.या अहवालाच्या आधारे या दुध डेअरी ना नोटीस काढणार असल्याचे व या वरील त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा दुग्ध विकास अधिकारी व दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी सांगितले आहे.
error: Content is protected !!