युनेस्को वारसा किल्ल्यांसाठी कु. आसमा कुरणे यांची धाव; प्रतापगड ते पन्हाळा टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि युवकांमध्ये दुर्गसंवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कोल्हापूरची कन्या कु. आसमा कुरणे हिने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील शिवकालीन १२ किल्ल्यांपर्यंत धावत जाण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तिच्या या धाडसी आणि प्रेरणादायी मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून विविध सामाजिक संस्था,शिवप्रेमी आणि प्रशासनाकडून तिला पाठिंबा मिळत आहे.कु.आसमा कुरणे हिने मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथून या विशेष मोहिमेला प्रारंभ केला.संपूर्ण मोहिमेस सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागणार असून या कालावधीत ती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून प्रवास करीत शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले धावत जाऊन पूर्ण करणार आहे.या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि संवर्धनाची गरज जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे.सध्या प्रतापगड ते पन्हाळा या टप्प्यांतर्गत तिची धाव सुरू असून या प्रवासात नागरिकांकडून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.प्रतापगड ते पन्हाळा हा एकूण २२६ किलोमीटरचा प्रवास असून तो विविध टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. २३ मे रोजी प्रतापगड ते मेढा असा ५० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २४ मे रोजी मेढा ते सातारा २५ किलोमीटर, २५ मे रोजी सातारा ते कराड ५४ किलोमीटर आणि २६ मे रोजी कराड ते इस्लामपूर ३० किलोमीटरचा टप्पा तिने पूर्ण केला.आज बुधवारी दि. २७ मे रोजी इस्लामपूर ते कोल्हापूर असा ४६ किलोमीटरचा टप्पा ती पूर्ण करणार असून गुरुवार दि. २८ मे रोजी कोल्हापूर ते पन्हाळा असा अंतिम २१ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून प्रतापगड ते पन्हाळा ही धाव पूर्ण होणार आहे.या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनालाही सूचना देण्यात आल्या आहेत. धाव मोहिमेदरम्यान कु.आसमा कुरणे ज्या-ज्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे,त्या जिल्ह्यांमध्ये तिच्या सुरक्षिततेसाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.दीर्घ अंतर धावत पार करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनानेही या मोहिमेस सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.आसमा कुरणे हिच्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये फिटनेस, चिकाटी आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.विशेष म्हणजे एका तरुणीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वारशासाठी धाव घेणे ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले.या मोहिमेद्वारे शिवरायांचे गड-किल्ले आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून तिच्या या धाव मोहिमेचे केली जात आहे.आसमा कुरणे यांच्यासोबत टोप उपकेंद्र व पुलाची शिरोली उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी स्टाफ व ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांची नावे आहेत वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँड्रयुज, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश्वरी दाबडे, आरोग्य सेवक विनोद जाधव,किरण कारंडे,सागर पोळ, आरोग्य सेविका रुपाली पांडे,कोमल कांबळे, रुग्णवाहिका चालक सरदार पाटील,शुभम पाटील, मयूरी टकले हे त्यांच्यासोबत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!