कन्या शाळा हेरवाड येथे स्व.अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

हेरवाड / प्रतिनिधी 

येथील कन्या शाळा, हेरवाड येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा व नेतृत्वगुणांचा गौरव करत आदरांजली अर्पण केली.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा उलगडून सांगितला. अचूक नियोजन, प्रभावी प्रशासन, तल्लख कार्यकौशल्य आणि दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवनातील त्यांची कार्यपद्धती, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि विकासाभिमुख विचार विद्यार्थ्यांनी आदर्श म्हणून स्वीकारावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनीही स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा परिचय करून घेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी बाबालाल बाणदार, दिलीप शिरढोणे, गुंडा परीट, ज्योती परीट, गीता ढवळे, धनश्री होनमाने, प्रेरणा मोरे यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा समाजहितासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणास्रोत म्हणून अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!