अंकली / प्रतिनिधी
कोल्हापूर-सांगली मार्गावर असणाऱ्या उदगाव-अंकली टोल नाका येथे मंगळवार १७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली.या घटनेत गाडीतील प्रवासी प्रसंगसावधनतेमुळे बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.आग लागल्यानंतर काही क्षणात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली,पण गाडीतील प्रवाशांना कुठलीही शारीरिक दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला फोन केला,परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.आग लागल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,परंतु सुदैवाने गाडीतील प्रवासी वेळेत बाहेर पडले आणि जीवितहानी टळली.या गाडीचे मालक बाहेरील राज्याचे असल्याने त्यांचे नाव पोलिसांतुन समजू शकले नाही.आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.