इचलकरंजीत ॲमेच्युअर तायकांदो अकॅडमी तर्फे समाज जागृती शिबिर

इचलकरंजी / प्रतिनिधी

 

इचलकरंजी सोशल मीडियाचा अतिरेक वापर केवळ वेळेचा अपव्यय करत नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून सोशल मीडिया मर्यादित वापरावी असा सल्ला हरिद्वार येथील विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी सिमरन अरोरा,अंकिता भट्ट आणि शिखा वर्मा यांनी अनमोल असा सल्ला दिला.इचलकरंजीतील ॲमेच्युअर तायकांदो अकॅडमी तर्फे आयोजित समाज जागृती शिबिरात त्या बोलत होत्या.सदरचे शिबिर सोमवार 16 डिसेंबर रोजी राजीव गांधी भवन समोरील कापड मार्केट येते पार पडले.यावेळी अखिल विश्व गायत्री परिवार पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य श्रीमान राजेंद्र प्रसाद बोहरा उपस्थित होते.या सर्वांचे स्वागत कराटे प्रशिक्षिका सौ किरण चौगुले ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांनी केले.तर सदरचे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी ब्लॅक बेल्ट रोहित सुतार,रिया चौगुले,शौर्य शिरगावे यांनी प्रयत्न केले
या शिबिरात या हरिद्वारच्या विद्यार्थिनींनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला या शिबिरात व्यायामाचे महत्त्व आणि संतुलित आहाराविषयी योग्य ती चर्चा करण्यात आली विद्यार्थिनींनी व्यायामाच्या नेहमीच सवयीमुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक तणाव कमी होतो असे सांगितले संतुलित आहार घेणे केवळ शरीराला पोषण देत नाही,तर रोगप्रतिकार शक्ती वाढवते विशेषता तरुण पिढीने जंक फूड पासून दूर राहून फळे भाज्या आणि पोषण मूल्यांनी युक्त अन्नाचा आहारात समावेश करावा असे आवर्जून सांगितले.शेवटी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी योग्य ती समर्पकपणे उत्तरे दिली.या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनीही हजेरी लावल्याने चांगला प्रतिसाद दिसत होता.यावेळी किडझी प्री स्कुलच्या को ओर्डीनेटर नीतू पारीक, मांगीलाल पुरोहित ,ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांनी स्वागत केले.सिनियर ब्लॅक बेल्ट सौ.किरण चौगुले यांनी आभार मानले.यावेळी मुले-मुली कराटेपटू खेळाडू तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!