शिरोळ / प्रतिनिधी
गत हंगामात तुटलेल्या ऊसास २०० रुपये मिळावेत आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाला ३७०० रुपये द्यावेत या मागणीसाठी शिरोळ तहसीलसमोर दुसऱ्या दिवशीही आंदोलन अंकुशचे धरणे आंदोलन सुरु आहे.
भागातील ऊस प्राधान्याने तोडावा,इंट्री खुशाली चालणार नाही, क्रमपाळी नुसार ऊसतोड व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी आज मंगळवार सांगितले.या धरणे आंदोलनात उदय होगले, दत्तात्रय जगदाळे,प्रमोद बाबर,बाळासाहेब भोगावे,बंडू होगले,शशिकांत काळे, दादामिया जैना,प्रकाश झाबरे हे उपस्थित होते.आज आंदोलनाची दखल घेऊन आज साखरसह संचालक यांनी माहिती घेतली आणि उद्या सर्व साखर कारखाण्यांची शिरोळ तहसीलदार कार्यालयात बैठक लावणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांच्याशी संपर्क करून सांगितले.