नागपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्यावतीने नुतन आमदारांचा सत्कार

कुंभोज / प्रतिनिधी 

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने नुतन आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची “आमदार पदी” निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) व हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांची “आमदार पदी” निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघ नागपूरचे राज्यअध्यक्ष योगेश वागदे,ज्येष्ठ पत्रकार व हिंगोली तथा राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार,सरचिटणीस भूषण दडवे,नागपूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे,उपाध्यक्ष रामगोविन्द खोब्रागडे,नागपूर जिल्हा सचिव प्रकाश कुंभे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!