दत्तवाड / प्रतिनिधी
शेडशाळ केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठा गट समूहगीतात कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद(गाव) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रश्नमंजुषा मोठा गटात तृतीय क्रमांक मिळविला.लहान गट समूहनृत्यात तिसरा क्रमांक आला.यशस्वी विद्यार्थ्यांना सविता उपाध्ये,मुकुंद कुंभार,चंद्रकांत नवटे यांचे मार्गदर्शन लाभले.तर प्रभारी मुख्याध्यापक दिपक कदम,अरुण कांबळे,वैशाली आवटी,शिलप्रभा माळी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांचे प्रोत्साहन लाभले.