वाळ्यासारखा दिसणारा आढळला दुर्मिळ जातीचा पोवळा साप

दत्तवाड / प्रतिनिधी

दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस अमोल शामराव कोळी यांना त्यांच्या अंगणात वाळ्यासारखा दिसणारा एक लहान साप दिसून आला.अमोल कोळी यांनी सर्पमित्र

संतोष पाटील यांना फोनवरून साप आल्याची माहिती दिली.सर्पमित्र संतोष पाटील घटनास्थळी तात्काळ हजर झाले.साप पाहणी केली असता तो साप विषारी वर्गातील

पोवळा जातीचा असल्याचे समजले.दत्तवाड मध्ये हा साप पहिल्यांदाच पहिल्याचे सर्पमित्र संतोष पाटील,मोरेश्वर सुतार, पप्पू खोत,सोहेल गवंडी,तुषार सुतार यांनी सांगितले.

पोवळा साप आशिया खंडातील विषारी सापापैकी सर्वात लहान साप आहे.तोंड काळे,शरीराचा रंग तपकिरी,पोटाकडील भाग पोवळ्यासारखा नारंगी लाल,शेपटीवर दोन काळे ठिपके.

डिवचला गेले असता शेपटी गोल करून शेपटाच्या खालील नारंगी भाग प्रदर्शित करून चावण्या आधीची चेतावणी देतो.सदर साप पकडल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाचे
बचाव पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार यांना फोनवरून देण्यात आली.

घटनास्थळावरून या सापास निसर्गात मुक्त करण्यात आले.या कामी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस.कांबळे, कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!