२१ व्या गळीत हंगामास शुभारंभ
टाकळीवाडी / प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्री गुरुदत्त शुगर्स ने सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे.त्यामुळे गुरुदत्त शुगर्स व शेतकरी यांचे अतुट नाते तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असून यंदाच्या गळीत हंगामात उच्चांकी ऊसदराची पंरपरा कायम ठेवत असून शेतकऱ्यांनी जास्तीत – जास्त ऊस गाळपास कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले.कारखान्यांच्या २१ व्या गळीत हंगाम शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम प्रसंगी श्री.घाटगे बोलत होते.चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्री.घाटगे म्हणाले,गेली २० वर्षे कारखान्याने अनेक टप्पे पार पाडत आज साखर उद्योगात भरारी घेतली आहे.शेतकरी व कारखाना ही साखर उद्योगाची दोन चाके असून ती व्यवस्थित चालली तरच साखर कारखानदारी टिकणार आहे.त्यामुळे यंदाचा हंगाम लवकर सुरु होणेसाठी शेतकरी संघटनेने सामंजस्याची भूमिका घेऊन गळीत हंगाम सुरु करण्यास सहकार्य करावे अशी विनंती श्री.घाटगे यांनी यावेळी केली.कारखान्याच्या मयत झालेल्या दोन कर्मचारी यांच्या कुंटूंबियांना कारखाना व्यवस्थापना कडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच सुरक्षा सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले . स्वागत व प्रास्ताविक संचालक बबन चौगुले यांनी केले. कार्यक्रमास गुरुदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे , माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर , कुरुंदवाड चे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माजी जि.प. सदस्य विजय भोजे , दत्त नागरी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने – देशमुख, शिरोळ भाजपा चे अध्यक्ष मुंकुंद गावडे, शिरोळ चे नगरसेवक डॉ. अरविंद माने ,श्रीवर्धन माने देशमुख,दादासो कोळी,संभाजी भोसले , सुरेश सासणे, अन्वर जमादार, महेश देवताळे , शिवाजी सांगले, दिलीप माणगावे, शाम बंडगर (सर) सदाशिव आंबी, प्रविण माणगावे, बजरंग कुंभार तसेच शेतकरी व कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.