जिल्हास्तरीय शासकीय किकबॉस्किंग क्रिडा स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय शासकीय किकबॉस्किंग क्रिडा स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे घवघवीत यश

कोल्हापुर जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय कोल्हापूर व अमॅच्युर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोशियन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी ब्रिलियंट स्कूलस् नरंदे येथे जिल्हास्तरीय शालेय शासकीय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात व निर्विवाद पार पडल्या.सदर स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे खालील वयोगटात मुले व मुली एकूण 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी मॅडम,स्कूलच्या संस्थापिका शुभांगी पाटील मॅडम, नितीन पाटील सर,अमॅच्युर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोशियनचे अध्यक्ष निलेश परीट,सचिव प्रकाश निराळे स्पर्धा तांत्रिक प्रमुख संभाजी दिंडे,किरण थोरात, नेमिनाथ मगदुम,राहुल देवकुळे,राजेंद्र व्हरकट,आश्लेषा परीट व सर्व पंच उपस्थित होते.या सर्वांच्या सहकार्यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडल्या.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे.या स्पर्धेमध्ये बिलियंट स्कुलस् नरंदेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 17 वर्षाखालील गटात रितेश राजेंद्र चव्हाण,लोकेश विनोद खंडाळे,आर्यन शशिकांत नागरगोजे यांनी सुवर्णपदक पटकावले. तर 19 वर्षाखालील गटात रोहन गणेश ढोबळे याने सुवर्ण पदक पटकाविले. 17 वर्षाखालील गटात सार्थक नितिन शेळके,राम बाबासाहेब चव्हाण, कृष्णा राहुल कारंडे,अथर्व शिवाजी खुसपे, रितेश सोमनाथ फडतरे, यांनी सिल्व्हर मेडल पटकावले. दिगंबर सुनिल बोडके, तुषार मल्हारी मोरे, यांना ब्रॉन्झ मेडल मिळाले.
मुलींच्या 17 वर्षाखालील गटात समृद्धी संजय सुळंबे, श्रावणी धनाजी पाटील,समिक्षा दिपक शेटे यांना सिल्व्हर मेडल मिळाले तर प्राची दरिबा गडदे,अस्मिता अनिल हाके, श्रावणी लक्ष्मण खांडेकर यांना ब्राँझ मेडल मिळाले.
सुवर्ण पदक मिळविणाऱ्या रितेश चव्हाण, आर्यन नागरगोजे, लोकेश खंडागळे, व रोहन ढोबळे यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शासकीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पदक विजेत्या सर्वच विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष नितिन पाटील, मुख्याध्यापिका शुभांगी पाटील, कार्याध्यक्ष संजयसिंह पाटील, अधिक्षक किरण थोरात, नेमिनाथ मगदुम, संदिप निकम सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!