इचलकरंजी शहरासह राज्यभरात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचे अभियान राबवले आहे.
इचलकरंजी शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी अधिकाऱ्यांनी थेट उपस्थित राहून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये विशेषतः युवा मतदारांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यावश्यक असून त्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे किती आवश्यक आहे, हे अधिकारी वर्गाने समजावून सांगितले. या जनजागृती मोहिमेतून अधिक प्रभावी परिणाम साधण्यासाठी पथनाट्याचा वापर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवरील विविध पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्यांमधून मतदान न केल्यास होणारे परिणाम, त्याची सामाजिक जबाबदारी याबाबतचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले.मतदान दिवसाच्या अगोदर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन मिळावा, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी अशी जनजागृती कार्यक्रमाची आखणी केली जात आहे.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपविभागीय अधिकारी
समिरसिह साळवे उपायुक्त संजय काटकर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन पाटील यांच्या सह नागरिक व अधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते