जयसिंगपूर / प्रतिनिधी
मतदान जनजागृती अभियान SVEEP उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.शासकीय,निमशासकीय,शासनाच्या उपक्रमांतर्गतच्या सर्व आस्थापनांमध्ये मतदान जागृतीसाठी विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.मतदार शपथ, मॅरेथॉन,सायकलरॅली,रांगोळी स्पर्धा अशा अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत.जेणेकरून मतदानाची टक्केवारी ८५ % हून अधिक झाली पाहिजे. यासाठी २८० शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे,अनिलकुमार हेळकर,नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम राबविला जात आहे.जयसिंगपूर येथील कुलकर्णी पॉवर टूल्स या कंपनीत हजारो कामगार काम करीत आहेत.येथील इंडस्ट्रिज अधिकारी,कर्मचारी यांनी मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन शिरोळ तालुक्याच्या स्वीपप्रमुख तथा गट शिक्षण अधिकारी सौ.भारती सुनिल कोळी यांनी केले आहे. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील, कुलकर्णी पॉवर टूल्सचे प्रमुख कुलकर्णी साहेब,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.