सत्ता संपत्तीचा वापर करून साखर कारखानदारांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड पैसा फेकायला सुरुवात केली आहे.बाजारातला भाजीपाला विकत घ्यावा तशी माणसे विकत घेतली जात आहेत.मात्र शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,कामगार या साऱ्या वंचिताचे मूलभूत प्रश्न घेऊन आमचा लढा सुरू आहे.शेतकऱ्यांना लुबाडून साखर सम्राट यांनी निवडणुकीत प्रचंड पैशाच्या वापर करून चारी बाजूंनी आमची कोंडी केली असली शिरोळ तालुक्यातील सर्व सामान्य मतदारांनी अजून ईमान विकलेले नाही,त्यामुळे स्वाभिमानी जनतेच्या बळावर या कारखानदाराच्या उरावर बसून २३ नोव्हेंबरला विजयी गुलाल लावून ताट मानेने विधानसभेमध्ये प्रवेश करणार आहे.
जोपर्यंत उल्हास पाटील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असा निश्चय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी हसुर ते व्यक्त केला.