इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकपदी मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री.सुरेश शंकर कोळी सर यांची श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज इचलकरंजी पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल सहकारी शिक्षकांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.मूळचे शिरढोण ता.शिरोळ गावचे रहिवासी आहेत.ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील एक हरहुन्नरी व व्यासंगी असणाऱ्या व्यक्तिमत्वाची पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळालेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.