हातकणंगले / प्रतिनीधी
गेल्या पन्नास वर्षात विवीध राजकीय पुढाऱ्यांनी विवीध संघटनांच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदार संघात जातीचे राजकारण करत निवडणूका लढवल्या , मात्र या मतदार संघातील जनतेला आजवर हक्का पासुन वंचीत रहावे लागले . त्यामुळे मतदार संघातील सर्वच मतदारांना न्याय देण्यासाठी व त्यांचा हक्क देण्यासाठी रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडीया (आंबेडकर पक्ष ) यांच्या वतिने डॉ गणेश वाईकर यांची उमेदवारी निश्चीत करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी जाहिर केली .
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या , आजवर ज्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले , त्यांनी केवळ स्वताचा स्वार्थ साधला आहे , काहिंना जनतेने नाकारले ज्यांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा नारा दिला त्यांना ही समाजाने हाकलुन लावल्याचा आरोप त्यांनी माजी आम डॉ मिणचेकर यांचे नांव न घेता केला , हा मतदार संघ म्हणजेच आम्हा सर्वांचा म्हणजेच आरक्षीत घटकांचा आहे , त्यामुळे या मतदार संघाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी डॉ गणेश वाईकर यांची उमेद्वारी जाहीर करण्यात आली आहे .पत्रकार परिषदेस विश्वासराव तरटे, डॉ गणेश वाईकर , अमर तांदळे , समाधान सोनवले , वंदना वायदंडे ,मिनाक्षी वाईकर यांच्या सह पक्षाचे पदाधीकारी उपस्तीत होते