भास्कर शेटे यांच्यामुळे हातकणंगले तालुक्यातील भाजपाला पुन्हा मोठी ताकद

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना हातकणंगले तालुक्यातील जेष्ठ नेते भास्कर शेटे यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.या प्रवेशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्याशिवाय अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. श्री. शेटे यांच्या प्रवेशामुळे हातकणंगले तालुक्यातील भाजपाला पुन्हा मोठी ताकद मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच हातकणंगले तालुक्यातील मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या श्री. भास्कर शेटे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हातकणंगले विधानसभेसाठी भाजपाचा सहयोगी पक्ष जनसुराज्य पक्षाने या मतदारसंघावर पूर्वीपासून दावा केला आहे ,मात्र गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच हा मतदार संघ भाजपाकडेच असावा अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली होती, त्यामुळे भास्कर शेटे यांच्या भाजपा प्रवेशाला अंतर्गत राजकीय महत्त्व आहे दरम्यान  शेटे यांचा मतदारसंघात असणारा मोठा संपर्क याशिवाय विधानसभा निवडणुकीचा दोन वेळेचा अनुभव याचा फायदा पक्षाला होईल असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. याशिवाय आवाडे, माने आणि महाडिक गटाची मोठी ताकद त्यांना मिळू शकते असे राजकीय चित्र असल्याने या मतदारसंघात भाजपाचा करिष्मा होऊ शकतो दरम्यान श्री. शेटे यांच्या भाजपा प्रवेशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रकाश आवाडे ,मंत्री गिरीश महाजन या प्रमुख नेत्यांसह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
फोटो :

Spread the love
error: Content is protected !!