कुंभोज / प्रतिनिधी विनोद शिंगे
संपूर्ण महाराष्ट्रातील गायरणामधील अतिक्रमण धारकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिक्रमने काढण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आलेल्या आहेत.परंतु असे झाल्यास संबंधित
अतिक्रमणे धारक कुटुंबावर बेघर होऊन निवारा अभावी उघड्यावर राहण्याची नामुष्की येणार आहे.त्यामुळे सन 2002, 2004 व 2011 च्या शासनाच्या निर्णयानुसार गायरणामधील
अतिक्रमणे नियमित करून संबधिताची नावे सातबारा किंवा मिळकत पत्रकी लावण्यात यावी व वर्षानुवर्षे अतिक्रमणात रोजंदारी करून वास्तव्यास असणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांना
शासनाने न्याय द्यावा.तसेच हा निर्णय आगामी हिवाळी अधिवेशनात घेण्यात यावा आशा मागणीचे निवेदन यावेळी हातकणंगलेचे माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली हातकणंगलेचे अप्पर तहसीलदार खिलारी यांना देण्यात आले.यावेळी माजी जि.प.सभापती प्रवीण यादव, मा.जी.प.सदस्य महेश चव्हाण,मिणचे सरपंच रंजना जाधव,
लक्ष्मीवाडी मा.सरपंच रामदास हांडे,ग्रा.सदस्य अभिनंदन शिखरे,अजय कांबळे,भरत नाईक,अभिजित कोळी,नितीन कदम,तसेच रणजीत मोरे,सुरेश भगत,बशीर नायकवडी, अशोक जाधव,योगेश चव्हाण,प्रदीप भातमारे,यशवंत वाक्से, विनयकुमार पाटील आदी उपस्थित होते.