इचलकरंजी येथे संजय गांधी निराधार योजनेतील 3 हजार लाभार्थ्यांना पत्र वाटप

इचलकरंजी शहरातील संजय गांधी निराधार योजनेतील 3 हजार लाभार्थ्यांना आज पत्र वाटप

करण्यात आले.हे पत्र माजी खासदार निवेदिता माने,माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद राहुल आवाडे,समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आज पत्र देण्यात आले.आज पर्यंत अनिल डाळ्या अध्यक्ष झाल्यापासून 11 हजार लाभार्थ्यांना पत्र वाटप करून निधी देण्यात आला आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.इचलकरंजी शहरामध्ये संजय गांधी निराधार योजनेमार्फत आजवर तीस हजार नागरिकांना या योजनेचा लाभ झाला आहे. शहराचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या हे झाल्यापासून आजवर 11 हजार नागरिकांना याचा लाभ व मंजुरीचे पत्र दिले आहेत व पैसे खात्यात आले आहेत.याचा अनुषंगाने नवीन नियुक्त 3 हजार लाभार्थ्यांना    पत्रे आज खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने,माजी आमदार सुरेश  हाळवणकर,माजी जिल्हापरिषद सदस्य डॉ  राहुल प्रकाश आवाडे व अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर बोलताना म्हणाले सध्या आम्हीही लाभार्थी झालो आहोत. आम्हाला आमचाच कळेना पण तुम्ही खरे लाभार्थी आहात तुमच्या खात्यावर महिन्याला पैसे येत आहेत.नवीन लाभार्थ्यांना जी मंजुरीचे  पत्र दिले आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.गरिबांना पुढचे पाच वर्ष धान्य मोफत पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा देश विकसित करण्याचा आहे.गरीब नागरिक हा  गरीब राहिला नाही पाहिजे या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्ष लढत आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांना निवडून द्या असे आवाहन करण्यात आले केंद्रामध्ये राज्यांमध्ये महायुतीचे सरकार आहे त्यामुळे येणारी विधानसभा मध्ये संपूर्ण माहितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच राहुल आवडे बोलताना म्हणाले मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने मी काम करतो मी  जिल्हा परिषद सदस्य असताना  लाखो कोटीची कामे विकास कामे केली आहेत पण भाजपच्या अजेंडा खाली मला आता काम करायचे आहे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीनेच मी सर्वसामान्य सदस्य म्हणून काम करेल भाजपवाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आवाडे परिवाराचा मोठे योगदान इथून पुढे राहील समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या बोलताना म्हणाले प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत  संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पोहोचल्याशिवाय राहणार नाही आज तीन हजार नियुक्तीपत्रे देताना मला आनंद होत आहे आजवर तीन कार्यक्रम घेऊन 11 हजार लाभार्थ्यांना मी आजवर न्याय  देण्याचे काम केले आहे तसेच जून जुलै ऑगस्ट महिन्याचे  पैसे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतील आता 3 हजार लाभार्थ्यांचे पत्र वाटप करण्यात येत आहे ज्यांचे पत्र आजून राहतील ते विधानसभा निवडणूक झाल्यावर देण्यात येतील त्यामुळे महायुतीतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांना तुम्ही भरभरून प्रेम द्या असे आवाहनही त्यांनी केले आहे या कार्यक्रमाला  माजी खासदार  निवेदिता माने माजी आमदार सुरेश हाळवणकर जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हिंदुराव शेळके तानाजी पवार अजित मामा जाधव पैलवान अमृत मामा भोसले प्रकाश दतवाडे अनिल डाळ्या व राजीव गांधी सरिता आवळे समितीचे सर्व सदस्य व सरकारी तलाठी कर्मचारी व महायुती  पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!