इचलकरंजी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गेल्या 40 वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवावा यासाठी छत्रपती संभाजी महाराज प्रेमी व त्या
भागातील भागातील समितीने आज सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे.यावेळी माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेचे राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन या ठिकाणी या चौकात पुतळा बसवण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.गेल्या 40 वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवावा यासाठी भागातील नागरिक व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांनी वेळोवेळी आंदोलन करून निवेदन दिले आहेत.पण प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे गेल्याच काही दिवसापूर्वी कॉम्रेड के एल मलाबादे चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.पण मूळ मागणी गेल्या 40 वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज चौकात बसवावा यामागणीकडे प्रशासने दुर्लक्ष केले. याच अनुषंगाने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले.जर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तयार असताना सुद्धा प्रशासन का परवानगी देत नाही असा सवाल संभाजी महाराज प्रेमींनी केला आहे.या लक्षणीय उपोषणाला छत्रपती संभाजी महाराज समितीचे पदाधिकारी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.