महाराष्ट्र राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामारांची संख्या जास्त प्रमाणात आहे.सन २०१३ साली बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापन झाले,तरी मंडळ स्थापन झालेपासून आजतागाईत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रूपये शिल्लक आहे. तरी महाराष्ट्र सरकारकडे अनेक वेळा दिपावली बोनस बांधकाम कामगाराला द्यावे या मागण्याचे अनेक वेळा निवेदन दिले,आंदोलन झाली त्याची दखल घेऊन आज शासनाने बांधकाम कामगारांना दीवाली बोनस म्हणून 5 हजार रुपये देण्याचे जाहिर केल आहे.त्यामुळे शहरातील के.एल.मलाबादे चौकात लाल बावटा बांधकाम कामगार संघटना ( सीटू ) च्या वतीन साखर पेढ़े वाटून आनंदोत्सव
साजरा करण्यात आला.यावेळी कॉ.भरमा कांबळे यांनी शासनाने आज जरी 5 हजार रुपये बोनस म्हणून जाहिर केले असले तरी आमची मागणी 10 हजार रुपये बोनस मिळावा ही आहे.त्यामुळे सध्या शासनाची 5 हजारांची मदत आम्ही स्वीकरत आहे.मात्र उर्वरित 5 हजार रुपये मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर येत्या काळात 60 वर्षा वरील बांधकाम कामगारांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी आमचे शिष्टमंडळ कार्यरत असणार आहे आणि आमच्या सर्व मागण्या शासनाला मान्यच कराव्या लागतील असे प्रतिपादन केले.यावेळी कॉ.सदा मलाबादे, कॉ.दत्ता माने, कॉ.नूरमहम्मद बेळकूड़े, आदींसह शहरातील सर्व बांधकाम कामगार उपस्थित होते.