महायुती सरकारच्या काळ्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा

इचलकरंजी / प्रतिनिधी

महायुती सरकारच्या काळ्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील संसद रत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी शहरात येत आहे.ही यात्रा दुपारी साडेबारा वाजता शिवतीर्थ येथून सुरू होणार आहे.

मोटरसायकल रॅलीने शिवतीर्थ येथून के.एल.मलाबादे चौक,महात्मा गांधी पुतळा मार्ग नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे जाहीर सभा होणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन करंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचाराचा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी, सामाजिक न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी,गद्दारांना धडा शिकवण्यासाठी, महाराष्ट्राचे उज्वल भविष्य, महिला सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासह बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आणि रयतेच्या मनातील शिवस्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शिलेदारांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य .मदन कारंडे व शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. तसेच या कार्यक्रमात इतर पक्ष्यातील आजी – माजी पदाधिकारी यांचाही प्रवेश होणार असल्याचे कारंडे यांनी सांगितले या . पत्रकार बैठकीला उदयसिंग पाटील, अब्राहम आवळे,अभिजित रवंदे, नागेश शेजाळे, दशरथ माने आदी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!