ऊस उत्पादक शेतकरी ऊस पाठवण्याच्या विवंचनेत.
दोन दिवसांपूर्वी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण ऊस तोडीचा कार्यक्रम ठप्प झाला.सदलगा येथील सी डब्ल्यू सी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक 30 व एक डिसेंबर सलग दोन दिवस सतरा मिलिमीटर व दहा मिलिमीटर पावसाची नोंद सदलगा परिसरात झाल्याने संपूर्ण शेत शिवारात पाणी साचून राहिले त्यामुळे या
परिसरातील सर्व ऊस तोडणी बंद पडल्या.मुळातच यावर्षी ऊस दरासंदर्भात आंदोलन झाले,त्या आंदोलनाने ऊस तोडीचा हंगाम पंधरा दिवस पुढे गेला.ऊस दराचा प्रश्न मिटतो ना मिटतो
तोपर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सर्वच ऊस उत्पादकांची तारांबळ उडाली.एकूणच काय ऊस तोडीचा हंगाम एक महिना पुढे पावसामुळे ऊसतोड मजूर आपल्या तळावर
बसून राहिले,त्यामुळे त्यांचे देखील अतोनात हाल झाले.त्यांचा संसार उघड्यावर पडला,पावसाने अन्नधान्य भिजले त्यांची तारांबळ उडाली.एकंदरीत अजून किमान दहा दिवस तरी जोरात
ऊस तोडीचा हंगाम सुरू होणार नाही,अशी चिन्हे सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे.सदलगा परिसरात उपलब्ध ऊस उत्पादित क्षेत्रापैकी सर्वसाधारण अंदाजे 30 ते 35 टक्के
उसाची तोडणी झाली असून अजून 70 ते 75 टक्के ऊस शिल्लक राहिला आहे,त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ऊस पाठवण्याच्या विवंचनेत निसर्गाकडे पाहत बसला आहे.प्रत्येक
वर्षी यांना त्या कारणाने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने एकंदरीत उसाची शेती कितपत फायद्यात आहे,याचा विचार आता शेतकरी करू लागले आहेत.