राजू शेट्टींनी केली पावसाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी
सांगली / प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगली भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,या नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.द्राक्ष पीक विमा
योजनेचे पैसे तात्काळ द्यावेत अन्यथा रस्त्यावर उतरू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.शेट्टी यांनी मिरज,तासगाव,कवठेमहांकाळ
तालुक्यातील द्राक्ष बागांची पाहणी केली.यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे.त्यासाठी ऊस
उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बागायतदारांनी संघटित होण्याची गरज आहे.राज्य सरकारने अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची तात्काळ पंचनामे करून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची
कर्जे माफ करावीत अशी मागणी ही शेट्टी यांनी केली आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,पोपट मोरे,सावकार मादनाईक,संजय बेले,संजय खोलखुंबे,भरत चौगुले,नंदू नलवडे,श्रीधर उदगावे,बाळासाहेब सुरेश वसगडे, सुहास केरीमाने यांच्यासह द्राक्ष बागायतदार शेतकरी उपस्थित होते