दत्तवाड येथे भाजप कार्यकर्त्यांचे साखर पेढे वाटून आनंद उत्सव

शिरोळ / प्रतिनिधी


मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल दत्तवाड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी

करत साखर व पेढे वाटून आनंदोउत्सव साजरा केला.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करून आपला विजय

मिळवला आहे.येथील गांधी चौक,दसरा चौक आदी ठिकाणी विजयाच्या घोषणा देत कार्यकत्यांनी पेढे वाटून आंनद साजरा केला.यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील,पंचायत

राज्य व ग्राम विकास विभाग जिल्हा सहसंयोजक सुरेश पाटील,दत्तवाड भाजपा अध्यक्ष कुमार पाटील गिरप्पा,सचिन चिखले,सुनील कुंभार,तेजस वराळे,राहुल पाटील,किरण कमते,

अशोक नेरले,एम.एस.पाटील,आप्पासो गोरे,प्रकाश पाटील ,मनोज पवार,निखील जोशी,अजित वटारे,भूपाल खरपी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!