सदलगा / प्रतिनिधी प्रतिक कदम
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ३६ ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षणासाठी नुकतेच पाठविण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठीचे प्रशिक्षण असणार आहे.ऊस शेती ज्ञानयाग अंतर्गत चार दिवसांच्या
प्रशिक्षण कार्यशाळा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे
आयोजित केली होती.तिथे केन कमिटी चेअरमन याहूल आवाडे यांनी होतकरु सभासद ऊस उत्पादक तरुण ३६ शेतकऱ्यांना
कारखान्याच्या वतीने पाठविले.यावेळी संचालक सूरज बेडगे आण्णासाहेब गोटखिंडे आदी उपस्थित होते.