बेडकीहाळ / कृष्णा आरगे
बेडकिहाळ येथील समस्त धनगर समाज व कनकदास युवक मंडळ यांच्या वतीने गुरुवार तारीख 30 रोजी संत श्रेष्ठ भक्त कनकदास यांची 536 वी जयंती भक्तिमय वातावरणात व ढोलाच्या गजरात साजरी करण्यात आली.
सकाळी 10 वाजता बस स्थानक परिसरात चिकोडी येथील पूर्णाकृती कनकदास पुतळा परिसरातून कनकदास युवक मंडळाच्या वतीने आणण्यात आलेल्या कनक ज्योतीचे स्वागत धनगर समाजाच्या महिला वर्गा कडून पूजन करून तर बाळू मेटकर यांनी श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, सदस्य संजय पाटील, अब्दुलवाहब पटेल, तात्यासाहेब केस्ते, जीवन यादव, पिंटू आरगे, सदस्या सौ सुवर्णा बत्ते, ग्राम विकास अधिकारी अशोक झेंडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, शिवू शेट्टी, संजय बाबर, सी एम पाटील, यांनी कनक ज्योतिचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी धनगर समाजाच्या वतीने कनक सैनिकांना आहेर मानपान करण्यात आला.
यावेळी ढोलाच्या गजरात तर मुलींच्या लेझिम वाद्याच्या निनादत कनक ज्योतीचे मिरवणूक बेडकीहाळ सर्कल,जुना बस स्थानक, बाजार पेठ,शिवाजी पेठ,दसरा चौक,मार्गे रामनगर परिसरातील श्री विठ्ठल बिरदेव मंदिरा पर्यंत काढून ज्योत प्रतिष्ठापणा स्थापना करण्यात आले.
यावेळी फोटो पूजन तिप्पना कोरे यांनी करून श्रीफळ सिदू कोरे आणि वाढवले.यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा गीत सादर करून जन्मोत्सव केला.याप्रसंगी शामराव बत्ते,बाळू कोरे,महादेव कोरे,बिरू बत्ते,रमेश आरगे,लक्ष्मण कोरे,
कामू मेटकर,बाबू बत्ते,अण्णाप्पा कोरे,व्हनाप्पा बत्ते,रघुनाथ बत्ते,धोंडीबा कोरे,सागर कोरे,महेश बत्ते,ओमकार बत्ते,गणेश बत्ते,विठ्ठल कोरे,भागुबाई कोरे,शोभा कोरे,चंदव्वा मेटकर,सुरेखा आरगे,मायाव्वा मेटकर,आरती बत्ते,
शोभा बत्ते यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्ते नागरिक महिला उपस्थित होते.आभार म्हाळु बत्ते यांनी मानले.