राजाराम विद्यालयात विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिर
शिरोळ – चंद्रकांत भाट
आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत तसेच आरोग्य संपन्न जीवन जगता यावे यासाठी सदैव पर राहून या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य सेवा प्रामाणिकपणे देत राहू असे आश्वासन शिरोळचे
माजी नगरसेवक व कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांनी दिले.डॉ अरविंद माने यांच्या माध्यमातून आणि माने केअर डायग्नोस्टिक सेंटर प्रा लि जयसिंगपूर यांच्या विद्यमाने येथील राजाराम विद्यालय
क्रमांक २ या शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिर उद्घाटन प्रसंगी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते.शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट बोलताना म्हणाले की
नगरसेवक अरविंद माने यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे त्यांचे आदर्शवत कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केले.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी आभार
मानले.माने केअर डायग्नोसिक सेंटरचे भाग्योदय ढवळे,रणजीत मोरे, प्राची जाधव,ओंकार लोहार, राहुल माने, श्रेणिक माने, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल जगदाळे, सदस्य रवींद्र पाटील,मारुती जाधव,
अध्यापक सनी सुतार,सुनंदा पाटील,त्रिशला येळगुडे,मीनाक्षी हेगाण्णा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.