रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीकडून विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

शिरोळ / प्रतिनिधी

मासिक पाळी ही मुलींच्या तसेच स्त्रियांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून त्याबाबत मनात भीती न्यूनगंड न बाळगता सामोरे गेले पाहिजे.मासिक पाळी दरम्यान चिडचिडेपणा,थकवा,पोटदुखी,कंबरदुखी,पाय दुखणे, चिंता नैराश्य भावनिक मूड बदलणे अशा समस्या उद्धभवू शकतात त्यासाठी संतुलित आहार पुरेशी विश्रांती हलका व्यायाम योगासने याबरोबर योग्य प्रकारे स्वच्छता राखणेही तितकेच महत्वाचे आहे.असे विचार डॉ अतुल पाटील यांनी व्यक्त केले.

 

येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने येथील रुक्मिणी पांडुरंग माने (रहिमतपूरकर) कन्या विद्या मंदिर आणि इंग्लिश स्कूल मौजे आगर या शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य डॉ. अतुल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

 

डॉ पाटील बोलताना पुढे म्हणाले की मासिक पाळीदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यास मुत्रमार्गात जंतू संक्रमण होणे,बुरशीजन्य त्वचाविकार,गर्भाशयाचा कॅन्सर अशा गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. नित्य आहारात लोह,कॅल्शियम तसेच बी जीवनसत्व जास्त प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास चांगली प्रतिकारक्षमता निर्माण होण्यास मदत होते.

 

मासिक पाळी दरम्यान सॅनीटरी नॅपकिन,मासिक पाळी कप तसेच आरोग्यदायी अंतर्वस्त्रांचा वापर केल्यास होणाऱ्या दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), खजिनदार चंद्रकांत भाट,सदस्य सचिन सावंत, अमित जाधव,सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे,

 

सुरज कांबळे सुशांत कांबळे माने कन्या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ पी ए हेरवाडे,अध्यापिका पी.एन. चौगुले,चौगुले पी.व्ही.चौगुले,एस.एस.हंकारे,सुरेश पाटील, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक जयश्री पाटील,नितीन बागुल,पृथ्वीचंद मांछरेकर,असिया तांबोळी,

 

 

सुप्रिया दाभाडे,धनश्री माने,सर्जेराव पोवार,सिद्धार्थ कांबळे, अभिषेक ढोकळे यांच्यासह दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love
error: Content is protected !!