लायन्स क्लब शिरोळची लोकोपयोगी कार्यात वेगळी ओळख – ला.सुनील सुतार

लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

शिरोळ /प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षात लायन्स क्लब ऑफ शिरोळने समाजाप्रती आदर राखत गरजूंना मदत करत आपल्या लोकोपयोगी कार्यातून नवीन ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ला. सुनील सुतार यांनी केले.

 

येथील टारे मंगल कार्यालयात लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला.प्रारंभी अमोल देशमुख यांनी ध्वजवंदना केली विश्वशांती प्रार्थना राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सुनील देशमुख यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा आपल्या स्वागत व प्रास्ताविकात घेतला.लायन्स क्लबचे समन्वयक विजय जमदग्नी,नूतन सदस्य राहुल जाधव,सुशांत माने यांना शपथ दिली.या समारंभात जलसंपदा विभागात मोजनीदारपदी निवड झालेल्या सबिहा शेख,आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे, रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष बुधाजी चुडमुंगे, सचिव अमोल देशमुख, खजिनदार अभिजीत गुरव यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील ला. प्रवीण चौगुले ॲड सुरेश बागडी, गजानन चव्हाण, अजीत गतारे, सनीसिंग पाटील, महेश मोरे, चंद्रशेखर पाटील, किशोर पाटील-रेंदाळकर,

 

 

युवराज पाटील, सचिन माळी,भालचंद्र सासणे, सुनील देशमुख, अभिजीत माने,प्रसन्न पाटील, डॉ रवी भोसले,डॉ सुशांत पाटील,डॉ अशोक कोटगीरे,सर्जेराव पाटील,राजेंद्र बांदिवडेकर यांना पदाची व जबाबदारीची माहिती देत पदग्रहण सोहळा पार पडला.

 

या समारंभात बोलताना माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की लायन्स क्लब शिरोळने वृक्षारोपण आरोग्य शिबीर शैक्षणिक साहित्याचे वाटप यासह समाज हिताचे उपक्रम राबवून शिरोळच्या प्रगतीत भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचे कार्य समाजाला आदर्शवत आहे.

 

 

लायन्स क्लबचे अध्यक्ष बुधाजी चुडमुंगे म्हणाले की लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि सहकारी सदस्यांच्या सहकार्याने विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून शिरोळच्या विकासात भर टाकण्याचा प्रयत्न करू यावेळी राजेंद्र गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.माजी झोन चेअरमन सचिन माळी यांनी आभार मानले राजेंद्र प्रधान यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

यावेळी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, माजी सरपंच गजानन संकपाळ, गोरखनाथ माने, माजी नगरसेवक डॉ अरविंद माने, पै प्रकाश गावडे,एन वाय जाधव,रावसाहेब पाटील-मलिकवाडे, श्रीवर्धन माने- देशमुख, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने- देशमुख, लायन्स क्लबचे सदस्य रामप्रसाद पाटील,

 

संदीप रायान्नावर,डॉ विशाल चौगुले,राहुल खोत,प्रल्हाद कुंभार, एम एस माने, दिगंबर माने यांच्यासह शिरोळ परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!