रक्षाबंधन करून युवा पडिला दिला अनोखा संदेश
शिरोळ /प्रतिनिधी
येथील श्रीराम मंदिरात ह भ प वासकर वारकरी संप्रदायाच्यावतीने गोकुळाष्टमीनिमित्त बुधवार दिनांक 21 ते मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 अखेर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने कीर्तन प्रवचन भजन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.आज महिला व लहान मुलींच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे समाजातील संस्कृतीला तडा जात आहे.युवा पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी मंगळवारी श्रीराम मंदिरात रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित महिला भगिनींनी राखी बांधून बहीणभावाचे पवित्र नाते जपण्याचा संकल्प केला.तर वारकरी बंधूंनी आहेर म्हणून पैठणी साडी बहिणीला भेट बहिणीच्या रक्षणाचे अभिवचन दिले.
प्रत्येक वर्षी श्रीराम मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.यावर्षीही बुधवार ते मंगळवारी या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले हनुमान भजनी मंडळ तुंग समर्थ महिला भजनी मंडळ शिरोळ माऊली भजनी मंडळ शिरोळ, संत सेना भजनी मंडळ जयसिंगपूर, जनाई भजनी महिला मंडळ, कुटवाड, ज्ञानदेव भजनी मंडळ चिंचवाड यांचा भजनाचा कार्यक्रम झाला ह भ प ज्ञानेश्वर सुर्यवंशी (डिग्रज),गुरुवर्य ज्ञानेश्वर वास्कर महाराज (पंढरपुर) श्रीकृष्ण पाटील (करोली), शहाजी पाटील (पडळ), राजू पाटील (चंदूर), पिलासो देशमुख (शिरोळ) महेश कळेकर (शिरोळ) यांच्या कीर्तनाचा सोहळा संपन्न झाला सोमवारी रात्री बारानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला मंगळवारी ह भ प नामदेव पाटील ढवळी यांचे काल्याचे किर्तन झाले व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सायंकाळी पालखी दिंडी सोहळा झाला.मंगळवारी सकाळी उपस्थित महिला भगिनींनी सर्व वारकरी बांधवांचे औक्षण करून राखी बांधली आणि बहिण भावाचे पवित्र नाते जपण्याचा संकल्प केला वारकरी बांधवांनी सुद्धा आपल्या बहिणीला माहेरचा आहेर म्हणून पैठणी दिली आणि एक भाऊ या नात्याने बहिणीचे रक्षण करण्याचे अभिवचन दिले यावेळी राधा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ जयश्री पाटील बोलताना म्हणाले की आज समाजात महिला मुली आणि बालिकांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे समाजातील संस्कृती बिघडत चालली आहे. तरुणांची वाताहात होत आहे तरुणांना सुसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी वारकरी संप्रदायाने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करून समाजासमोर अनोखा संदेश दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक पंडित काळे दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर पत्रकार चंद्रकांत भाट ह भ प दिलीपराव माने रामचंद्र पाटील आप्पासो पुजारी बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर जी के माने केरबा लोहार पिंटू पाटील तात्यासो देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पारायण काळात खंडेराव माने,महेश कळेकर, शरद पाटील, आनंदा यशवंत माने, योगेश पाटील, रमाकांत संकपाळ, बाळासो चव्हाण, दगडू काळे,तात्यासो देशमुख, अरुण माने,रामचंद्र पाटील, आप्पासो पुजारी,चिंटू कोळी यांनी चहा अल्पपोहार आणि भोजनदान केले. ह भ प अंकुश लोंढे रोहन जगताप किरण ताराप-माने पिंटू कोळी विराज रमेश माने यांनी कीर्तन साथ व मृदंग मणी सेवा केली
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पाडण्यासाठी ह भ प दिलीपराव माने रामचंद्र पाटील विठ्ठल भाट (गुरुजी) निळकंठ उर्फ पिंटू फल्ले बाळासो कोळी (दिवाण) बापुसो गंगधर आप्पासाहेब पुजारी (सर) चंद्रकांत महात्मे आनंदा माने (पाटकरी) भानुदास माने, खंडु माने ज्ञानेश्वर माने पिलाजी देशमुख श्रीकांत माने रमाकांत संकपाळ बाळासो माने शशिकांत पुजारी बाबुराव पुजारी पिंटू कोळी सचिन तरपाटील विठ्ठल पाटील शरद पाटील योगेश पाटील यांच्यासह वारकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.