घरफाळ्यात १००% सूट पण ‘ही‘ असेल पालिकेची अट

कुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरुंदवाड येथील रहिवाशी मालमत्ता धारकांनी मार्च 2024 अखेरचा घरफाळा 31 डिसेंबर पर्यंत भरणाऱ्या रहिवाशी मालमत्ता धारकांना घरफाळा रकमेत 100 टक्के सूट देण्यात येणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने ही सूट देण्यात येणार

असून दहा भाग्यवान विजेते निवडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान पुढे म्हणाले

31 मार्च 2024 अखेरचा भरण्यात येणारा घरफाळा 31 डिसेंबर 2023 पर्यंत 100 टक्के भरतील त्यांना 100 टक्के सूट देण्यात येणार आहे.लकी ड्रॉ पद्धतीने १० भाग्यवान विजेते निवडण्यात येणार आहेत.

प्रथम क्रमांकास घरफाळा रकमेत 100 टक्के,द्वितीय क्रमांकास घरफाळा रकमेत 75 टक्के,तृतीय क्रमांकास 50 टक्के,चौथ्या आणि पाचव्या क्रमांकास 25 टक्के तर सहा ते दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना घरफाळ्यात 10 टक्के सूट मिळणार आहे.

शहरातील सर्व करदात्यांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कराची रक्कम वेळेत भरून या योजनेचे विजेते होण्याचा बहुमान मिळवावा असे सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे,प्रणाम शिंदे,अमोल कांबळे,नंदकुमार चौधरी शशिकांत कडाळे, अजित दिपकर, सुरेश सासणे आदी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!