स्वच्छतेसाठी सामाजिक संघटनानी अभियानामध्ये सहभाग व्हावे – मुख्याधिकारी प्रचंडराव

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता,देखभाल व दुरुस्ती मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरोळ नगरपरिषदेच्यावतीने शहरातील सर्व नागरिक,खाजगी संस्था, शासकीय व अशासकीय संस्था व कार्यालये,

राजकीय व्यक्ती व प्रभावी नागरिक तसेच बचत गट व इतर सामाजिक संघटना यांना सदर अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी शिरोळ नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांनी जाहीर आवाहन केले आहे.

यामध्ये शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता,देखभाल व दुरुस्ती मोहीम आणि सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये या बाबींचा समावेश हा मुख्य उद्देश आहे.
स्वच्छ शौचालय अभियान अंतर्गत स्वच्छता कार्य, युनिफॉर्म, साइनेज आणि ब्रांडिंग शौचालयाची देखभाल व दुरुस्ती योजना, सुधारित देखरेख यंत्रणा,

वापरकर्त्याच्या सवयीत बदल करणे, महिला बचत गटाद्वारे शौचालय वर्गवारी, आकांक्षी शौचालये ग्राउंडिंग (मुलभूत गोष्टींचे परिपूर्ण प्रशिक्षण), सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, नुतनीकरण व किरकोळ दुरुस्तो, सार्वजनिक शौचालयाच्या वापराबाबतच्या धारण सुधारण्याकरिता

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती,शिक्षण व प्रसार मोहीम,सार्वजनिक शौचालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा, समाजिक लेखापरीक्षणासाठी बचत गटातील महिलांकरिता प्रती शौचालय प्रोत्साहन निधी,Clean Toilets Campaign या Hashtag चा वापर सोसियल मेडिया पोस्ट्स करताना करावा

व राष्ट्रीय SBMHandle@Swachh Bharat Gov यांना Tag करावे असे आवाहन शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.

Spread the love
error: Content is protected !!