असा झाला दत्तवाडच्या बनावट वॉशिंग पावडरचा पर्दापाश

दत्तवाड / प्रतिनिधी
दत्तवाड (ता.शिरोळ)दरम्यानच्या दानवाड रस्त्यावरील पत्र्याचा शेडध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून त्याचे व्हील वशिंग पावडरच्या नामसाधर्म्य पाकिटातून त्याची विक्री केली जात होती.अशाच प्रकारची बनावट वॉशिंग पावडर उत्पादन केल्याप्रकरणी मध्यप्रदेश येथे एकाला अटक केली आहे.या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई-गुजरात येथील विशेष पथकाने छापा टाकला असता व्हील वशिंग पावडरशी नामसाधर्म्य असलेली हुबेहूब दिसणारी 30 टन बनावट वाशिंग पावडरची पाकिटे व मशिनरी आणि मोकळी पाकिटे जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान व्हील वशिंग पावडरच्या स्पेलिंग मधील डबल्यूच्या ठिकाणी व्ही.व्ही जोडून व्हील या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारे पाकीट तयार करून कॉपीराईट अँक्टचा भंग करून राज्यात परराज्यात बनावट वॉशिंग पावडर विक्री करत असताना या प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यप्रदेश येथे सापडला त्याची सखोल चौकशी केली असता दत्तवाड येथे असलेल्या अड्ड्याची माहिती मिळाल्याने पथकाने छापा टाकून कारवाई केली.दत्तवाड येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या सहा ते आठ महिण्यापासून कपडे धुण्याचा पावडरीचा कारखाना सुरू होता.या कारखान्यात व्हील कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या नामसाधर्म्य असे व्हील या नावाच्या (wheel)या स्पेलिंग मधील डब्ल्यू ऐवजी व्ही.व्ही (vvheel)असा बदल करून व्हील वाशिंग पावडरसारखे दिसणारे पाकीट तयार करून कंपनीचा नामसाधर्म्य पाकिटमध्ये कॉपीराईट अँक्टचाभंग करत पावडर पॅकिंग करून जिल्ह्यात,परजिल्ह्यात, कर्नाटक आणि परराज्यात या पावडरची विक्री केली जात होती. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या अड्ड्यावर छापा टाकून नामसाधर्म्य पाकिटात पॅकिंग असणाऱ्या वाशिंग पावडरीची पाकिटे,कच्चा 30 टन माल,पॅकिंग पाकिटे, व मशिनरी असे साहित्य जप्त केले आहे.ही कारवाई मुंबई,मध्यप्रदेश आणि गुजरात येथील पथकाने ही कारवाई केली आहे.या कारवाई बाबत स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला कोणतीच माहिती नाही.
हुबेहूब दिसणारी पाकिटे;कंपनीची न्यायालयात दाद
व्हील वॉशिंग पावडरच्या स्पेलिंग मधील डबल्यूच्या ठिकाणी व्ही.व्ही जोडून व्हील या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारे हुबेहूब पाकीटमधून बनावट पावडर विक्री केली जात होती.व्हील कंपनीने याप्रकरणी न्यायालयात दाद मागत कॉपीराईट अँक्टचा भंग केल्याकडे लक्ष वेधले होते.न्यायालयाने चौकशीसाठी पथक नेमले व सर्वप्रथम या बनावट वॉशिंग पावडर प्रकरणाचा म्होरक्याला मध्यप्रदेशात गजाआड केले. त्याच्याकडील माहितीवरुन पथक दत्तवाडमध्ये आले आणि पर्दापाश झाला.
Spread the love
error: Content is protected !!