कुरुंदवाड येथील कृष्णा वेणीची यात्रा भरविण्यासाठी हॉटेल अशोका लगतच्या शेतकऱ्यांनी साडेपाच एकर शेती देण्याचा निर्णय दिला आहे.त्यामुळे यात्रा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.2 एकरात खेळणे-पाळणे डिजने-लँड तर साडे तीन एकरात खेळणी व कॉस्मेटिक दुकाने आणि खाऊ गल्ली थाटण्यात येणार आहे.कृषी जनावरे प्रदर्शन कुस्ती गण शूटिंग अशा विविध स्पर्धां लोकसहभागातून शानदार शामियाण्यात पार पडणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान भाविकांना यात्रेचे तिकीट खाऊ आणि कॉस्मेटिक खेळणी खरेदीसाठी व्यावसायिकांनी स्वस्तात व डिस्काउंट रेट मध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यल्प भाडे आकारणी करून लकी ड्रॉ पद्धतीने जागा वाटप करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने कुरुंदवाडवासियातून समाधान व्यक्त होत आहे.येथील महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती.यावेळी प्रशासक चौहान बोलत होते.पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रशासक चौहान म्हणाले यात्रेसाठी संजय तोडकर,महादेव नाईक यांनी साडेपाच एकर शेती दिली आहे. खेळणी कॉस्मेटिक स्टॅलसाठी अडीच हजार रुपये तर भेळ-आईस्क्रीम खाऊस्टॅलसाठी 10 हजार रुपये भाडे आकारणी करून लकी ड्रॉ पद्धतीने 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जागा वाटप करण्यात येणार आहे.तसेच गेल्या वर्षी जागा घेऊन भाडे न दिलेल्या थकबाकीदारांना या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी थकबाकीची रक्कम भरणा केल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही.खेळणे-पाळणे डिजने-लँडसाठी जागा देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.तसेच सालाबाद प्रमाणे कुस्ती,गण शूटिंग स्पर्धेसह आदी विविध स्पर्धा,कृषी प्रदर्शन,जनावरे प्रदर्शनातील विजेत्यांच्यावर बक्षिसांची लय लूट करण्यात येणार आहे.यावेळी आरोग्य अभियंता प्रदीप बोरगे, संगणक अभियंता प्रणाम शिंदे,आनंदा शिंदे,शशिकांत कडाळे,अभिजीत कांबळे, सचिन थरकार,संकेत कोथळे आदी उपस्थित होत.