राजीव पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा ठेवीदारांनी केली मागणी तहसील कार्यालयासमोर मारला ठिय्या
शिरोळ / प्रतिनिधी
औरवाड (ता शिरोळ) येथील राजीव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी ठेवीदारांचे पैसे बुडवले आहेत या संचालक मंडळावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठेवीदारांचे पैसे त्वरित मिळावेत या मागणीसाठी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मारला
राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांचे चार कोटी 58 लाख रुपयाचा अपहार संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी केला आहे सदरची पतसंस्था आवसनयात गेली आहे लेखापरीक्षकांनी संस्थेचे ऑडिट करून संचालक मंडळाच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे पत्र कुरुंदवाड पोलीस ठाण्यास दिले आहे पण अद्याप संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे गुरुवारी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी शिरोळ मधील शिवाजी चौकातून शिरोळ तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते
यावेळी बोलताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की औरवाडमधील अनेक नागरिकांनी रात्रंदिवस काबाडकष्ट करून मिळवलेला आपला पैसा सुरक्षित राहील म्हणून राजीव पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात प्रचंड अपहार करून ठेवीदारांचे पैसे लाटले आहेत अनेक ठेवीदारांना आपल्या आजारावरील उपचार ठेवेदारांचे मुलांचे लग्न घर बांधण्यासाठी पैसे आवश्यक आहेत पण संस्था बुडीत गेल्यामुळे ठेवीदारांचे पैसे बुडत आहेत याला सर्वस्वी संचालक मंडळ व कर्मचारी जबाबदार असून खोटी कागदपत्र सादर करून संस्थाचालक व कर्मचाऱ्यांनी विविध व्यक्तींच्या नावे कर्ज दाखवून पैशांचा अपहार केला आहे अशा संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्यावर जोपर्यंत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा घेतला.सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पतसंस्था संचालक मंडळांवर गुन्हा दाखल करण्याची मंजुरी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्यास मिळाली आहे दोन दिवसात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल असे आश्वासन दिले पण जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका ठेवीदारांनी घेतली.या आंदोलनात प्रतापराव सूर्यवंशी राहुल काकडे भास्कर गावडे महावीर कुंभोजे जयपाल उगारे सुखदेव गावडे तौफिका पटेल मयुरी गंगधर शोभा सूर्यवंशी हुसेनबी बहाद्दूर यांच्यासह या ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.