रावसाहेब देसाई,ॲड.उदय मोरे,प्रवीण चुडमुंगे,शिवम माळकर,प्रज्ञा माळकर यांच्या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद
शिरोळ / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिरोळ येथील व्हिजन आयडॉल्स करिअर अकॅडमी , साप्ताहिक राधा महिला सोशल फौडेंशन शिवम अध्यात्मिक व सामाजिक सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली शिवस्फुर्ति व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली.व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्री.पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे संपन्न झाले.यावेळी बोलताना प्रमुख वक्ते रावसाहेब देसाई म्हणाले ध्येयहीन व दिशाहिन बनत चाललेल्या आजच्या युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.युवापिढीने आपले शरीर सुदृढ व मन कणखर बनवले पाहिजे.या कार्यक्रमाचे स्वागत राजू नाईक यांनी तर प्रास्ताविक ॲड. श्रीकांत माळकर यांनी केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. ए.मुल्ला होते. माजी मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी आभार मानले.मेजर प्रा.के,एम,भोसले,तुकाराम गंगधर, दत्तात्रय खडके,महेश कुंभार यांच्यासह मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुसरे पुष्प केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळ या ठिकाणी झाले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते ॲड.उदय मोरे म्हणाले काळ कितीही बदलला आणि वर्षे कितीही लोटली तरी इथल्या माणसांच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात महाराजांचा इतिहास अखंडपणे तेवत राहील.अतिशय स्फूर्तिदायी व प्रेरणादायी दाखले देऊन त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे स्वागत किरण पाटील तर प्रास्ताविक ॲड.श्रीकांत माळकर यांनी केले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता घोरपडे होत्या.सौ.शिनगारे , दत्तात्रय कुंभार,सौ.मनीषा कुंभार,सौ.जयालक्ष्मी कुंभार , शिवाजीराव पाटील कौलवकर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.तिसरे पुष्प ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाले.या ठिकाणी प्रवीण चुडमुंगे यांनी तर न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे चौथे पुष्प प्रज्ञा व शिवम माळकर यांनी गुंफले.याही व्याख्यानास विद्यार्थी, शिक्षक,पालक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.प्रवीण चुडमुंगे यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले तर प्रज्ञा व शिवम माळकर यांनी सद्यस्थितीच्या संदर्भात शिवचरित्राची गरज सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी बालवक्ते चि.वेदांत विवेक फल्ले व कु.ईश्वरी नामदेव कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे व प्रेरणादायी विचारांचे अतिशय प्रभावी सादरीकरण केले.वरील सर्व कार्यक्रमास प्राचार्य पी.एस.काकडे,मेजर प्रा.के.एम.भोसले,खंडेराव जगदाळे, डॉ.अतुल पाटील,शहाजी दाभाडे,पत्रकार चंद्रकांत भाट, रोटरीचे अध्यक्ष संजय शिंदे,दत्तात्रय खडके,तुकाराम पाटील,सौ.जयश्री पाटील,सौ.दिपाली फल्ले,सौ.ऋतुजा शेट्टी,गायत्री मुळीक,मनोहर फल्ले,विलास पाटील, कृष्णात पाटील,महेश कुंभार,विक्रमसिंह भोसले,विवेक फल्ले सौ.मनीषा कुंभार,सौ.जयालक्ष्मी कुंभार,सौ.सुवर्णा पाटील,सौ.शोभा हेरवाडे आदी मान्यवर विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.