शिरोळ / प्रतिनिधी
येथील स्टेट बँक इंडिया शाखेला दुसऱ्याची कागदपत्रे देऊन 40 लाख रुपये फसवणूक केलेल्या अशोक मारुती कोरवी रा.म्हैसाळ यास जयसिंगपूर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.दरम्यान तालुक्याच्या पूर्व बाजूस असलेल्या एका गावांमधील पतसंस्थेमध्येही त्याने बोगस कागदपत्रे तयार करून 15 ते 25 लाख रुपयांचे फसवणूक केली असल्याची चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.
आरोपी अशोक मारुती कोरवी याने शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला बोगस कागदपत्रे देऊन लाख रुपये फसवणूक केली आहे.याबाबत शाखा अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली होती.त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस अधिक तपास करत आहेत शिरोळ येथील स्टेट बँके शिवाय इतर कोणत्या पतसंस्था व द्वितीय संस्थांना फसवले आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.अशोक कोरवी यास जयसिंगपूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची एक दिवशाची पोलीस कोठडी दिली आहे.अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मुल्ला हे करीत आहेत.